अभियंते संपावर…आजचा वीजपुरवठा संकटात…केंद्र सरकारच्या वीज सुधारणा विधेयकाला वाढता विरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभियंते संपावर…आजचा वीजपुरवठा संकटात…केंद्र सरकारच्या वीज सुधारणा विधेयकाला वाढता विरोध

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरासह जिल्हाभरातील वीजपुरवठा मंगळवारी (10 ऑगस्ट) संकटात पडण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हाभरातील महावितरण व महापारेषण कंपन्यां

नगरच्या बिग्मीद्वारे तब्बल 100 कोटींची फसवणूक; एसआयटी चौकशीची ठेवीदारांची मागणी
‘योग दिना’ला कट्टरपंथीयांची दहशत; व्हिडीओ व्हायरल | LokNews24
जी-20 चे प्रतिनिधित्व भारताच्या विकासाला बळकटी देणारे – प्रा. डॉ. हर्षा गोयल

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरासह जिल्हाभरातील वीजपुरवठा मंगळवारी (10 ऑगस्ट) संकटात पडण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हाभरातील महावितरण व महापारेषण कंपन्यांचे अभियंता लाक्षणिक संप मंगळवारी करणार आहेत. केंद्र सरकारद्वारे प्रस्तावित असलेल्या नव्या वीज सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून वीज अभियंते एक दिवसांचा संप करणार असले तरी त्याचा फटका जिल्ह्याच्या दैनंदिन जीवनाला बसणार आहे. मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाला वा विस्कळित झाला तर नागरिक व व्यावसायिकांचे हाल होणार आहेत.
केंद्र सरकार संसदेच्या सध्या सुरू असलेल्या मान्सून सत्रात वीज (सुधारणा) विधेयक 2021 मांडणार आहे. या विरोधात देशभरातील लाखो वीज कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळेच देशभरात 10 ऑगस्ट रोजी वीज पुरवठा बंद होऊ शकतो. ऊर्जा क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी आणि अभियंत्यांनी संसदेच्या सध्याच्या मान्सून सत्रात वीज (सुधारणा) विधेयक-2021 मांडण्याच्या विरोधात संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. देशभरातील 15 लाख कर्मचारी संपावर जाणार आहे. हे नवीन विधेयक घाईघाईत मंजूर करण्याऐवजी ते संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवायला हवे, असे वीज कर्मचारी व अभियंत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या वीज (सुधारणा)विधेयक-2021ला विरोध करण्यासाठी देशभरात 10 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व वीज अधिकारी व कर्मचारीही संपावर जात आहे. वीज कामगार, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीच्या आदेशानुसार, केंद्र सरकारच्या वीज उद्योगांच्या मनमानी खासगीकरण विरोधात लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात जिल्हाभरातील वीज उपकेंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आऊटसोर्सिंग स्टाफ सुद्धा 100 टक्के संपामध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यासह शेवगाव, पाथर्डी तालुक्यांसह नगर शहर व जिल्हाभरातील वीजपुरवठा मंगळवारी खंडित वा विस्कळित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुळा व ज्ञानेश्‍वर, अशोकनगरसह जिल्ह्यातील अन्य सहकारी कारखान्यांच्या विद्युत पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

उद्योग-व्यवसायांवर होणार परिणाम
संपाबाबत माहिती देताना सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे सर्कल सचिव अभियंता शंतनू सूर्यकर यांनी माहिती देताना सांगितले कि, वीज खासगीकरणाच्या विरोधात केंद्र सरकारच्या मनमानी कारभारास कंटाळून संयुक्त वीज कृती समितीने हे आंदोलन पुकारले असून संपूर्ण महाराष्ट्रभरातील अभियंता कर्मचारी वर्ग या संपात सहभागी होत आहे.

COMMENTS