बुलढाणा प्रतिनिधी - अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पहिली ते दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत
बुलढाणा प्रतिनिधी – अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पहिली ते दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून निधीच उपलब्ध नसल्याने हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित आहेत.अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रति विद्यार्थी १ हजार ८५० प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते, मात्र बुलढाणा जिल्ह्यात २०१९ -२० आणि २० – २१ या दोन वर्षातील २ हजार ३९० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे.. त्यामुळे राज्य सरकारने या विद्यार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.
COMMENTS