मोबाईलवर बोलताना हटकले, पतीला चक्क बॅटने बदडले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईलवर बोलताना हटकले, पतीला चक्क बॅटने बदडले…

अहमदनगर/प्रतिनिधी : मोबाईलवर कोणाशी बोलतेस असे विचारणार्‍या पतीस पत्नीने बॅटने मारहाण केली. ही घटना राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मोबाईलवर इतक्य

डॉ. रामकृष्ण जगताप यांची ’श्रीरामपूर साहित्य परिषद ’अध्यक्षपदी निवड
शिक्षकाला केलं जिवंतपणीच मृत घोषित l LokNews24
मनपा कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनलचा डंका

अहमदनगर/प्रतिनिधी : मोबाईलवर कोणाशी बोलतेस असे विचारणार्‍या पतीस पत्नीने बॅटने मारहाण केली. ही घटना राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मोबाईलवर इतक्या वेळ कोणाशी बोलतेस असे विचारल्याचा राग आल्याने पत्नीने लाकडी बॅटने पतीच्या डोक्यात मारुन व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे.
राहुरी रेल्वे स्टेशन भागात राहणारे नंदू लक्ष्मण आघाव (वय 4) हे त्यांच्या घरी असताना त्यांची बायको सौ. नीता नंदू आघाव ही मोबाईलवर बोलत होती. नंदू आघाव म्हणाले की, तू मोबाईलवर इतक्यावेळ कोणाबरोबर बोलत होती. तेव्हा नीता आघाव हीस राग आला व मी फोनवर बोलत नव्हते, असे म्हणून तिने घरातील लाकडी बॅटने पती नंदूच्या डोक्यात बॅट मारुन लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत पती नंदु जखमी झाला. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नीता नंदू आघाव हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार कटारे करीत आहे.

COMMENTS