पाथर्डी प्रतिनिधी- स्व. बबनरावजी ढाकणे साहेबांचे दु:खद निधन झाल्याचे एकूण अतीव दु:ख झाले, कोणताही राजकीय वारसा नसतांना पाथर्डी सारख्या दुष्काळी,
पाथर्डी प्रतिनिधी- स्व. बबनरावजी ढाकणे साहेबांचे दु:खद निधन झाल्याचे एकूण अतीव दु:ख झाले, कोणताही राजकीय वारसा नसतांना पाथर्डी सारख्या दुष्काळी, ऊस तोड मजूरांच्या तालुक्याचे नेतृत्व करण्याबरोबर राज्यात व केंद्रातही त्यांच्या नेतृत्वगुणांची छाप त्यांनी उमटवली. पाथर्डी-शेवगांव मतदारसंघाच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान देण्याबरोबरच, शिक्षण संस्था, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, उभारुन समाजाच्या हिताला प्राधान्य देवून सतत संघर्षातून आपल्या कर्तत्वशील नेतृत्वाने राज्यात व केंद्रातही नेतृत्व केले. त्यांच्या जाण्याने आपण एका संघर्षशील नेतृत्वाला मुकलो आहोत, त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना व भावपूर्ण श्रध्दांजली
COMMENTS