Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड तालूक्यात पाळला कडकडीत बंद

- सकल मराठा समाजाच्या वतीने दिली होती जामखेड बंदची हाक

जामखेड/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्य

विवेकबुद्धी जागरूक ठेवून सोशल मीडियाचा वापर करा -पोलीस अधीक्षक राकेश ओला
दिव्यांग आणि महिला मतदार नोंदणीची विशेष मोहीम
लोकजीवनातील भीती गांधी मार्गाने दूर करण्याची गरज : अरुण खोरे

जामखेड/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ दि 3 सप्टेंबर रोजी जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीने  जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा,जवळा नान्नज, आरणगाव आदी गावातही स्वयंस्फुर्तींने कडकडीत बंद पाळण्यात आला.
या बंदच्या वेळी व्यापारी व ग्रामस्थांनी स्वतःहुन आपले व्यवहार,दुकाने,व्यापारी प्रतिष्ठाने संपूर्णपणे बंद ठेवून आपला पाठींबा दिला. त्यामुळे शहरासह तालुक्यातही सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कोठेही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून त्यासाठी बंदोबस्त चोख ठेवला होता. स्वयंस्फुर्तींने आपली दुकाने बंद ठेवल्याने जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व लहान,मोठ्या व्यवसायिकांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.
तालुक्यातील पाडळी फाटा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी पाडळी फाटा बंद ठेऊन रस्त्यावर टीव्ही व टायर जाळून लाठीहल्ला घटनेचा निषेध केला. .यावेळी झिक्रीचे सरपंच दत्ता साळुंखे,सरपंच शहाजी गाडे, दत्ता रासकर, गणेश पवार, माऊली डीसले, शिवानंद काळे,काशिनाथ डुचे, तुळशीदास शिरसाठ,आकाश खैरे,विष्णु वाळके, रोहीत कसाब, गोवर्धन गाडे, अतुल शिनगारे,आशोक गाडे, तुषार पवार, डॉ कारंडे,संभाजी इकडे,आकाश पवार आदी उपस्थित होते. 

जातेगाव बंद – तालुक्यातील जातेगाव येथे शनिवार,दि.2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सरपंच बाँबी पाटील व प्रमुख  पदाधिकार्‍यांनी सर्व ग्रामस्थांनी एक मेसेज केला. त्याला प्रतिसाद म्हणून सर्व ग्रामस्थांनी जालना जिल्ह्यातील त्या घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने पूर्ण जातेगाव बंद ठेवून आपला निषेध नोंदविला.

आंदोलकांच्या धास्तीने एसटी बंद – जालना येथील लाठीचार्ज घटनेच्या निषेधाची राज्यभर तीव्रता पाहून जामखेड बस आगाराच्या बसेस सलग दोन दिवस आंदोलकांच्या धास्तीने बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे  तालुक्यातील शाळाही अघोषित दोन दिवस बंदच राहिल्या. अनेक ठिकाणी अडकलेले प्रवाशी मात्र मिळेल त्या वाहनाने घर गाठण्याच्या प्रयत्न करतांना दिसून आले.
————————————–

COMMENTS