Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक व्यापारयुद्धाला विराम!

वॉशिंग्टन ः अमेरिकेने जागतिक व्यापारयुद्ध छेडल्यानंतर जगभरात आर्थिक मंदी आणि महागाईचे संकट गडद झाले होते. त्याविरोधात अमेरिकन नागरिक देखील रस्त्य

 संदिप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छडा लागेल – आशिष शेलार 
अक्षय्य तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे ;- आमदार मोनिका राजळे 

वॉशिंग्टन ः अमेरिकेने जागतिक व्यापारयुद्ध छेडल्यानंतर जगभरात आर्थिक मंदी आणि महागाईचे संकट गडद झाले होते. त्याविरोधात अमेरिकन नागरिक देखील रस्त्यावर उतरले होते, तसेच जागतिक शेअर बाजारात देखील हाहाकार उडाला होता, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्यापारयुद्धाला 90 दिवसांसाठी विराम दिला आहे.
ट्रम्प यांनी टॅरिफ कराा 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. तसेच जागतिक बाजारपेठेप्रती चीनने दाखवलेल्या अनादरामुळे अमेरिका चीनवर आकारलेला कर आता 125 टक्क्यांपर्यंत वाढवत आहे, जो तात्काळ लागू होईल. असे ट्रम्प यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी घोषणा केली की, ज्या 75 देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना व्यापार चर्चेसाठी बोलावले आहे, त्यांना 90 दिवसांची टॅरिफ स्थगिती आणि परस्पर शुल्कात घट करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेसोबत व्यापार चर्चा करणार्‍या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.या देशांनी कोणत्याही प्रकारे अमेरिकेला प्रत्युत्तर दिलेले नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्या देशांच्या टॅरिफ प्लानला 90 दिवसांची स्थगिती देत आहे. तसेच या कालावधीत 10 टक्के कर कमी करण्याचा अधिकार संबंधित विभागांना मी दिला आहे, जो तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केले आहे.

अमेरिका-चीनमध्ये संघर्षाचा नवा अंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वाढत्या व्यापार युद्धाच्या दरम्यान शुल्क मागे घेऊन अमेरिकेविरुद्ध आघाडी न उघडलेल्या देशांना प्रोत्साहन दिले आहे. कारण बुधवारीच चीनने अमेरिकेवरील आयात शुल्क 34 टक्क्यावरून वरून 84 टक्के करण्याची घोषणा केली होती. म्हणून ट्रम्प यांनी चीनवरील कर 104 टक्क्यावरून 125 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, त्यामुळे दोन्ही देशांत संघर्षाचा नवा अंक बघायला मिळत आहे.

COMMENTS