लातूर प्रतिनिधी - शहरात रस्त्यावर थांबविलेल्या वाहनांना जॅमर लावून मनमानी पद्धतीने वसुली केली जात आहे. ही वसुली थांबविण्यात यावी, या प्रमुख मागणी

लातूर प्रतिनिधी – शहरात रस्त्यावर थांबविलेल्या वाहनांना जॅमर लावून मनमानी पद्धतीने वसुली केली जात आहे. ही वसुली थांबविण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पार्किंगची सोय नसताना तसेच रस्त्यावर मार्किंग केली नसतानाही टोइंग वाहनद्वारे वाहनांना जॅमर लावले जात आहे. मनमानी पैसे आकारल्यानंतरच जॅमर काढले जात आहे. हा वसुलीचा प्रकार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीने सोमवारी मनपाच्या प्रवेशद्वाराच्या पायर्यांवर ठिय्या मांडला होता. या आंदोलनात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्यासह शिरीष कुलकर्णी, ड. शैलेश गोजमगुंडे, प्रवीण सावंत, अजितसिंह पाटील कव्हेकर, रागिणीताई यादव, गणेश गोमचाळे, रवी सुडे, संजय गिरी, हवा पाटील, दिग्विजय काथवटे, गोटू केंद्रे, संगीत रंदाळे, देवा साळुंके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डास उत्पत्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराला रोखण्यासाठी शहरामध्ये डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, त्यासाठी धूर फवारणी करावी, दररोज कचरा उचलला जावा. कचरा डेपोवरील समस्या दूर कराव्यात. डेपोवर कचरा साचणार नाही, त्यासाठी डम्पिंग करणे गरजेचे आहे. त्याकडे मनपाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांनी केली. दरम्यान, जॅमर बसविण्याचे कंत्राट ज्या संस्थेला दिले आहे, त्या संस्थेच्या कर्मचार्यांना ड्रेस कोड नाही. वाहन चुकीच्या ठिकाणी कोण लावतेय याची वाट ते पाहत राहतात. त्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
COMMENTS