Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळीच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक

उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील घटना ; हल्लेखोरांचा शोध सुरू

लखनौ/वृत्तसंस्था ः रेल्वेच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ज

राजस्थानला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन
अयोध्या-दिल्लीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू
वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली विडी

लखनौ/वृत्तसंस्था ः रेल्वेच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 500 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जाहीर केली. हा कार्यक्रम सुरू असतांनाच उत्तरप्रदेशात वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञात आरोपींकडून तुफान दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
आरोपींनी केलेल्या दगडफेकीत वंदे भारत ट्रेनच्या खिडकीचा चक्काचूर झाला आहे. ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याच्या या धक्कादायक घटनेमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्याकडून बाराबंकीत रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. त्यात पीएम मोदी ऑनलाईन सामील झाले होते. कार्यक्रम सुरू असताना बाराबंकी जिल्ह्यातून जाणार्‍या गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अज्ञात आरोपींकडून जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत रेल्वेच्या दरवाजांसह खिडक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आरोपींच्या हल्ल्यात कोणत्याही प्रवाशाला इजा झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सफेदाबाद रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक होत असताना पायलटने ट्रेन न थांबवता लखनौला पोहचवली. त्यानंतर आता भारतीय रेल्वेकडून या धक्कादायक प्रकरणाची दखल घेण्यात आली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेच्या एस्कॉर्ट टीमने या घटनेची माहिती दिली असून त्यानंतर पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. परंतु पोलिसांना कोणतेही साक्षीदार अथवा पुरावे घटनास्थळी आढळून आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपींवर सरकारी संपत्तीचे नुकसान करणे आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS