Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 482 अंकानी घसरला तर निफ्टी 17,674 वर बंद

मुंबई / प्रतिनिधी : शुक्रवारी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यूमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने शेअर बाजार वाढ

कोविडच्या नव्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात : ना. शंभूराज देसाई
आबा गट इस्लामपूर पालिका निवडणुकीत 4 प्रभाग लढविणार
नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांचा लाभ घ्यावा : मंगला धोटे

मुंबई / प्रतिनिधी : शुक्रवारी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यूमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने शेअर बाजार वाढीसह बंद झाला होता. त्यामुळे शेअर बाजारातील सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. पंरतू आज दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 482.61 अंकांनी अर्थात 0.81 टक्क्यांनी घसरून 58964.57वर बंद झाला तर निफ्टी 109.40 अंकांनी अर्थात 0.62 टक्क्यांनी घसरून 17,674.95 वर बंद झाला.
आजच्या दिवसाची सुरुवात मात्र किरकोळ घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये 114 अंकांच्या वाढीसह 59333.18 वर सुरु झाली. निफ्टी 43.45 अंकांच्या घसरणीसह 17740.90 वर पातळीवर सुरु झाला.

COMMENTS