Homeताज्या बातम्यादेश

“औकातीत राहा”; रवींद्र जडेजाची पत्नी संतापली

रिवाबा जडेजाची भर कार्यक्रमात वादावादी

गुजरात प्रतिनिधी - गुजरातच्या जामनगरमध्ये भाजपच्या तीन महिला नेत्यांची आपापसात भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरात भाजपमधील भांडण आणि प्र

छावा क्रांतिवीर सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुणांचा प्रवेश 
शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुतीतूनच विरोध
पुणे महापालिका सरसकट लसीकरण करण्यास तयार

गुजरात प्रतिनिधी – गुजरातच्या जामनगरमध्ये भाजपच्या तीन महिला नेत्यांची आपापसात भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरात भाजपमधील भांडण आणि प्रचारानंतर जामनगरमध्ये तीन महिला नेत्यांमधील सार्वजनिक ठिकाणी तू-तू मैं मैं यामुळे पक्षात नवी फूट निर्माण झाली आहे. नुकताच जामनगर शहरातील एका कार्यक्रमात क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी आणि आमदार रिवाबा जडेजा यांना राग अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. सार्वजनिक ठिकाणी रिवाबा आधी महापौरांवर संतापल्या. त्यानंतर त्या खासदारांवर देखील संतापल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिवाबा जडेजा आणि जामनगरच्या महापौर बीना कोठारी यांच्यामध्ये काही कारणांवरुन वाद झाला. त्यानंतर महापौरांनी रिवाबाा यांना ‘शिस्तीत राहायचे, जास्त स्मार्ट व्हायचे नाही’, असे म्हटले. त्यानंतर रिवाबा यांना खूपच राग आला. त्या महापौरांवर संतापल्या. रिवाबा आणि महापौरांचा वाद पाहता खासदार पूनम माडम या वाद मिटवण्यासाठी मध्ये आल्या. तर आमदार रिवाबा त्यांच्यावर देखील संतापल्या. हा सगळा वाद तुमच्यामुळेच झाला असल्याचे म्हणत रिवाबा यांनी खासदारांना सुनावले. जामनगर शहरातील लखोटा तलाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘माझी माती, माझा देश’ या मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जामनगरच्या खासदार पूनमबेन माडम आणि जामनगरच्या महापौर बिनाबेन कोठारी यांच्यासह भाजप आमदार रिवाबा जडेजाही कार्यक्रमाला पोहोचल्या. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे आमदार रिवाबा जडेजा आणि महापौर बिनाबेन कोठारी यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली. भाजपच्या तीन महिला नेत्यांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या वादाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या समोरच या तिन्ही महिला नेत्या आपापसात भांड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या गुजरातमध्ये हा विषय चर्चेचा ठरला आहे

COMMENTS