Homeताज्या बातम्या

निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय नमो चषक हॉकी स्पर्धा

अजित पाटील यांची माहिती : 27 ते 30 जानेवारीअखेर होणार स्पर्धाइस्लामपूर / प्रतिनिधी : निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय नमो चष

एम. डी. पवार बँकेस 1 कोटी 53 लाखाचा नफा : वैभव पवार
ड्रेसच्या बुकिंग साठी दिलेले एडवान्सचे पैसे परत देण्यास दुकानदाराचा नकार. संतापलेल्या तरुणाने दुकानात घुसून घातला गोंधळ
ऊसतोड कामगारांची नोंदणी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण करण्याचे आवाहन

अजित पाटील यांची माहिती : 27 ते 30 जानेवारीअखेर होणार स्पर्धा
इस्लामपूर / प्रतिनिधी : निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय नमो चषक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शनिवार, दि. 27 ते मंगळवार, दि. 30 जानेवारी दरम्यान होणार आहेत, अशी माहिती निशिकांत दादा स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील यांनी दिली.
अजित पाटील म्हणाले, येथील पोलिस परेड ग्राऊंडवर निशिकांत (दादा) स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षापासून राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शनिवार, दि. 27 जानेवारी ते मंगळवार, दि. 30 जानेवारी 2024 या दरम्यान, ’नमो चषक हॉकी स्पर्धा 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत संघ नाशिक अटलरी, इन्कम टॅक्स पुणे, रिपब्लिकन मुंबई, महाराष्ट्र क्रिडा मंडळ कोल्हापुर, वडगाव हॉकी अ‍ॅकॅडमी, रेल्वे लाईन बॉईज पुणे, दिग्विजय नाईक फौंडेशन इचलकरंजी, शिवतेज स्पोर्टस कोल्हापुर, निशिकांतदादा स्पोटर्स अ व ब असे संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता आ. गोपीचंद पडळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, पोलीस निरिक्षक संजय हारुगडे, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रविण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण मंगळवार, दि. 30 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भाजपाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रथम विजेत्या संघास रोख 51,000/- व कायम चषक तर व्दितीय विजेत्या संघास रोख 25,000/-व कायम चषक बक्षिस म्हणुन देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त उत्कृष्ठ खेळी करणार्‍या खेळाडुंचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

COMMENTS