Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मीनाक्षी अवचरे यांना राज्यस्तरीय झाशीची राणी पुरस्कार प्रदान

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः शैक्षणिक व सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल नाशिक येथील तेजस फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा झाशीची राणी हा राज्यस्त

पीक विमा कंपन्यांकडून 75 कोटींपेक्षा अधिक फसवणूक
गणेश कारखान्यासाठी शेतकरी संघटना मैदानात
राहुरीत अक्षता मंगल कलशाचे जल्लोषात स्वागत

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः शैक्षणिक व सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल नाशिक येथील तेजस फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा झाशीची राणी हा राज्यस्तरीय पुरस्कार नेवासाफाटा कडा कॉलनी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती मीनाक्षी अवचरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तेजस फाऊंडेशनच्या अध्यक्षा मेघा डोळस व पोलीस अधिकारी श्रीमती अलका केंद्रे, अ‍ॅड. रंजिता कौर, सामाजिक कार्यकर्त्या कांचन सदाशिवे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अधीसेविका विजया खोले, पोलिस अधिकारी त्रिवेणी उर्फ राणी चोपडे, कृषी अधिकारी नाथकुमार घोलवाड, कवी महेंद्र तुपे यांच्या हस्ते व सदरचा पुरस्कार मिनाक्षी अवचरे यांना प्रदान करण्यात आला.
    सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत नाशिक येथील तेजस फाऊंडेशनचा राज्यस्तरीय झाशीची राणी पुरस्कार मिनाक्षी अवचरे यांना मिळाल्याबद्दल त्यांचे नेवासा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, कॅम्पस ग्रुपचे प्रमुख अजय कुलकर्णी, नेवासा प्रेस क्लबचे संपर्कप्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण, इंजिनियर रमेश अवचरे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS