Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातून 5 ऑक्टोबरनंतर मान्सूनचा परतीचा प्रवास

पुणे/प्रतिनिधी : यंदा समाधानकारक पाऊस नसतांना मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्‍चित झाला आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास पश्‍चिम राजस्थानमधून सुरु

कुर्ला परिसरातील १२ मजली इमारतीला भीषण आग
मुंंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मला मारण्याचा प्रयत्न केला… किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

पुणे/प्रतिनिधी : यंदा समाधानकारक पाऊस नसतांना मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्‍चित झाला आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास पश्‍चिम राजस्थानमधून सुरु होणार आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा प्रवास थोडा उशिराने म्हणजे 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान होईल. 25 सप्टेंबरनंतर पश्‍चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे. शुक्रवारी मुंबई, पुणे व कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस बरसला. जुलै महिन्यात चांगला पाऊस बरसल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकर्‍यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑगस्टपर्यंत देशातील अनेक भागात पावसाची तूट निर्माण झाली आहे. पूर्वोत्तर भारतात 17 टक्के कमी पाऊस झाला आहे. पश्‍चिम भारतात8टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य भारतात पावसाची तूट 6 टक्के आहे. दक्षिण भारतात 16 टक्के कमी पाऊस झाला आहे. एकंदरीत देशात 7 टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे आता पावसाची सर्व आशा सप्टेंबर महिन्यावर आहे. या महिन्यात दमदार पाऊस झाल्यास नदी, नाले भरणार आहे.

COMMENTS