Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ वाडी-पाथर्डी बस सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी ; आंदोलनाचा इशारा

खरवंडी कासार : एकनाथवाडी येथील राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा मागील सुमारे वर्षभरापासून बंद असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः वृद्ध, शाळकरी विद्यार्थी तसेच महिलांना प्रवासासाठी मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. बस सेवा तातडीने सुरू करावी, यासाठी एकनाथवाडी ग्रामपंचायतीकडून पाथर्डी आगार प्रमुखांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १२) पाथर्डी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा खरवंडी कासार येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या वेळी बळीराम डोंगरे, सचिन नामदेव गायकवाड, सिद्धार्थ महादेव खेडकर, बळीराम आश्रुबा डोंगरे, बाप्पासाहेब खेडकर, अशोक आंबेकर, राजेंद्र माने, बाबा लक्ष्मण घुगे, बाबुलाल चेंमटे, रामदास जाधव, देविदास रामकिसन जाधव, शरद तुळशीराम टेकाळे, शिवनाथ शहादेव राख, गणेश विश्वनाथ ठोंबरे, अमोल विष्णु खेडकर, विनोद नवनाथ खेडकर, एकनाथ अजिनाथ खेडकर, परसराम महादेव खेडकर, गणेश महादेव खेडकर आदी उपस्थित होते.

धानोरे घाटावर ‘शिवतीर्थ’ साकारअहिल्यानगर जिल्ह्यात पहिलेच स्थळ
विखे पाटील फाउंडेशनचे दिव्यांगासाठीचे कार्य अतुलनीय  : भांगरे
धरणात बुडून युवकाचा मृत्यू

खरवंडी कासार : एकनाथवाडी येथील राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा मागील सुमारे वर्षभरापासून बंद असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः वृद्ध, शाळकरी विद्यार्थी तसेच महिलांना प्रवासासाठी मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

बस सेवा तातडीने सुरू करावी, यासाठी एकनाथवाडी ग्रामपंचायतीकडून पाथर्डी आगार प्रमुखांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १२) पाथर्डी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा खरवंडी कासार येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

या वेळी बळीराम डोंगरे, सचिन नामदेव गायकवाड, सिद्धार्थ महादेव खेडकर, बळीराम आश्रुबा डोंगरे, बाप्पासाहेब खेडकर, अशोक आंबेकर, राजेंद्र माने, बाबा लक्ष्मण घुगे, बाबुलाल चेंमटे, रामदास जाधव, देविदास रामकिसन जाधव, शरद तुळशीराम टेकाळे, शिवनाथ शहादेव राख, गणेश विश्वनाथ ठोंबरे, अमोल विष्णु खेडकर, विनोद नवनाथ खेडकर, एकनाथ अजिनाथ खेडकर, परसराम महादेव खेडकर, गणेश महादेव खेडकर आदी उपस्थित होते.

COMMENTS