Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरखेड तालुक्यात अज्ञातांनी एसटी बस पेटवली

नांदेड प्रतिनिधी - उमरखेड तालुक्यात गोजेगाव नजीक पैनगंगा पुलावर अज्ञात महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या स

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात
आमदार प्राजक्त तनपुरेंचा पाय खोलात
महावितरणच्या खाजगीकरणाविरुद्ध तीन दिवसांचा संप सुरु ; अहिल्यानगरमध्ये धरणे आंदोलन सुरु

नांदेड प्रतिनिधी – उमरखेड तालुक्यात गोजेगाव नजीक पैनगंगा पुलावर अज्ञात महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बसमधील 73 प्रवासी सुखरूप आहे. नांदेड आगाराची नांदेड- नागपूर बस रात्री 11 वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची बस एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने बस थांबवली त्याच्या सोबत पाच -सहा होते. बस थांबलेली पाहून सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. 

सुदैवाने बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहे. या घटनेमुळे बसचे सुमारे 32 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस पेटवणारे कोण होते हे समजू शकले नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून प्रकरणाचा तपास करत आहे. 

COMMENTS