Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर हे वाचन संस्कृतीचे माहेरघर होय ः डॉ. बाबुराव उपाध्ये              

श्रीरामपूर ः श्रीरामपूर हे वाचन संस्कृतीचे माहेरघर असून 01 सप्टेंबर 1947 ला श्रीरामपूर नगरपरिषद सुरु झाली, वाचनालय आणि अनेक वृत्तपत्रे वेगाने सुर

दुर्गामातांचा डॉ. महांडुळे यांनी केलेला सन्मान स्त्रीशक्तीचा उत्सव ः डॉ. बाबुराव उपाध्ये
अनाथांसाठी बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची तीर्थस्थळे ः डॉ. बाबुराव उपाध्ये
कृष्णानंद महाराजांचा बाल अनाथाश्रम मानवसेवेचे तीर्थक्षेत्र ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः श्रीरामपूर हे वाचन संस्कृतीचे माहेरघर असून 01 सप्टेंबर 1947 ला श्रीरामपूर नगरपरिषद सुरु झाली, वाचनालय आणि अनेक वृत्तपत्रे वेगाने सुरु झाली. साहित्यसंस्था सुरु झाल्या, शिक्षण आणि ग्रंथालये सुरु झाली. अल्पावधित श्रीरामपूर हे वाचन संस्कृतीचे माहेरघर बनले, असे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे घरोघरी, प्रत्येक गावी वाचनालय ही चळवळ सुरु केल्याचा आनंद अनुभव देणारा कार्यक्रम करताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. उपस्थित मान्यवरांना डॉ. उपाध्ये लिखित तुकतेच प्रकाशित झालेले ’ग्रंथसंवाद’ हा ग्रंथसंदर्भ आणि’ माकडांच्या हाती शाळेची खिचडी आणि इतर पुस्तके भेट देऊन वाचन संरकृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, आरती उपाध्ये यांनी स्वागत केले. यावेळी राज्य चालक मालक संघटना संघर्ष ग्रुपचे सरचिटणीस सुभाषराव देशमुख, युवाग्रुपचे प्रसाद देशमुख, श्रीमती सोनाबाई देशमुख, अनिता देशमुख, दत्तात्रय देशमुख, मंदाकिनी उपाध्ये अन्य मित्रपरिवार उपस्थित होते. डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले, प्रत्येक कुटुंबाने पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमी आणि संस्कृतीप्रेमी झाले पाहिजे, घरी आलेल्या अथवा कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना बुकेऐवजी बुक देऊन सन्मानीत केले पाहिजे, ज्याच्या घरी पुस्तक त्याचे होईल भारी मस्तक हे लक्षात घेतले पाहिजे. ज्यांनी ज्ञानाशी नाते जोडले तेच जगाचे हिरो ठरले. आपले ऋषी, मुनी लिहिते झाले, संत आणि साहित्यिकांनी भरपूर पाहिले,वाचले आणि समाजासाठी अपार लिहिले. समर्थानी दिसामासी काहीतरी लिहावे संदेश दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मिसाईल मॅन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आदी महामानव हे वाचन संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत, ती संस्कृती घ घरोघरी असावी. त्यासाठी मुलांचे आणि मोठ्यांचे वाढदिवस हे भारतीय संस्कृतीयुक्त आणि पुस्तक भेटीने साजरे झाले पाहिजे तरच उगवती पिढी आदर्श होईल असे मत व्यक्त केले. सुभाषराव देशमुख यांनी वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या या चळवळीचे आणि पुस्तक प्रेमाचे कौतुक केले. आरती उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS