Homeताज्या बातम्यादेश

प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं

वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांनी तिकीट कलेक्टरला रेल्वेच्या टॉयलेटमध्ये कोंडून ठेवले. ट्रेनमध्ये गोंधळ झाल्याची माहिती मिळताच आरपीएफ आणि रेल्व

भरदिवसा ऑफिसमध्ये झाला स्फोट… | LOK News 24
समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा
“४९८ अ”वर पुनर्विचार करण्याची शिफारस!

वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांनी तिकीट कलेक्टरला रेल्वेच्या टॉयलेटमध्ये कोंडून ठेवले. ट्रेनमध्ये गोंधळ झाल्याची माहिती मिळताच आरपीएफ आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना शांत केले आणि इंजिनीअर्सना बोलावून इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्त करण्यात आला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आनंद विहार टर्मिनलवरून सुटल्यानंतर सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या B1 आणि B2 डब्यांमध्ये वीज गेली. यासोबतच या दोन्ही डब्यांच्या एसींनीही काम करणे बंद केल्याने संतप्त प्रवाशांनी या वीजकपातीची तक्रार तिकीट कलेक्टरकडे केली. वीज खंडित झाल्याने त्रासलेल्या प्रवाशांनी टीटीईला याचे कारण विचारले असता ते समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अनेक प्रवासी नाराज झाले आणि त्यांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.

COMMENTS