Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतापगड कारखान्याची निवडणूक शांततेत

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे गेली काही दिवसांपासून तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. संस्थापक सहकार पॅनेलचे सौरभ शिंदे व

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्यासह 308 श्‍वापदांची नोंद
व्हॅलेंटाईन डे निमित्त सह्याद्री देवराईकडून हडपसरच्या वडाला सातार्‍यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे गेली काही दिवसांपासून तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. संस्थापक सहकार पॅनेलचे सौरभ शिंदे व कारखाना बचाव पॅनेलच्या दीपक पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या सभा चांगल्याच गाजल्या होत्या. रविवारी उमेदवारांचे मतदान मतपेटीत बंद झाले असून आज मतमोजणी होणार आहे. सभासदांनी नेमके कोणाच्या पारड्यात बहुमत दिले आहे, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

सरासरी 52 टक्के मतदान; आज निकाल
कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शांततेत पार पडली असून या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार, दि. 13 मार्च रोजी एकूण सरासरी 52 टक्के इतके मतदान झाले आहे. जावळी व महाबळेश्‍वर तालुका क्षेत्र असणार्‍या प्रतापगड कारखान्याचे एकूण 6156 सभासद संख्या असून यापैकी 3206 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी 52.08 टक्के इतके मतदान झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व प्रकिया शांततेत पार पडली.
प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली. त्यापैकी तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 18 जागांसाठी एकूण 36 उमेदवार रिंगणात होते. सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेल व दीपक पवार यांच्या कारखाना बचाव पॅनेलमध्ये दुरंगी लढत झाली आहे. आज पंचायत समितीच्या बाबासाहेब शिंदे आखाडकर सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

COMMENTS