Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रेमींनी शांतता व संयमाच्या मार्गाने केला निषेध व्यक्त

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करुण हिंदु धर्माच्या भावना दुखावण्याचा

नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल
नगर जिल्ह्यात देशाला हादरून टाकणारा भ्रष्टाचार
मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट बेचिराख होता होता राहिला…

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करुण हिंदु धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याने शेवगाव शहरात रविवारी तणाव निर्माण झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल करणार्‍या दोन समाजकंटकावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्या घटनेचा निषेध म्हणून सोमवार 13 मार्च रोजी सकाळी शेवगांव मध्ये शिवप्रेमींकडून शेवगाव बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
या शेवगाव बंदला शेवगाव शहरातील व्यापारी व व्यवसायिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देत. हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येऊन शिवप्रेमी क्रांती चौक येथे निषेध व्यक्त केला.सकाळी साडेदहाच्या सुमारास शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये शिवप्रेमींनी एकत्र येऊन चौकातील सिद्धिविनायक मंदिरासमोर गणपतीची आरती केली. त्यानंतर सर्व शिवप्रेमींनी घोषणा देत शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर औरंगजेबाच्या विरोधात मोठी घोषणाबाजी झाली. व झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत घटनेतील सर्व आरोपींवर कडक शासन व्हावे अशी मागणी केली. हा निषेध मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने काढण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अहमदनगर वरून अतिरिक्त पोलिस कुमक यावेळी बोलण्यात आली होती. आजचा निषेध मोर्चा हा शांतता व संयमतेच्या मार्गाने करण्यात आला.

COMMENTS