Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहिफळेवस्ती शाळेसमोर स्पीड ब्रेकर अत्यावश्यक-दीपक देठे

बीड प्रतिनिधी - नवगण राजुरी ते पाथर्डी राज्य मार्गावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिफळेवस्ती ही शाळा मानूर ग्रामपंचायत अंतर्गत येते.या शाळेत शिक

आघाडीत बिघाडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल
पत्रकारावर हल्ला आणि समाज माध्यमातून मतभेद! 
20 रुपयांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | LOKNews24

बीड प्रतिनिधी – नवगण राजुरी ते पाथर्डी राज्य मार्गावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिफळेवस्ती ही शाळा मानूर ग्रामपंचायत अंतर्गत येते.या शाळेत शिक्षण घेण्यासाठी दूरवरून अनेक मुले येतात.ही शाळा राजुरी ते पाथर्डी राज्य मार्गावर तंतोतंत लागूनच आहे.रस्त्यावर वेगाने धावणार्‍या गाड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून तशा काही घटना ही मागील काळात घडलेल्या आहेत.अगदी एकाचा मृत्यू सुद्धा झालेला असून अपघाताचे प्रकार ही घडलेले आहेत.तत्कालीन यंत्रणेसमोर ही बाब लक्षात आणून दिली होती.रस्त्याचे काम पूर्ण होताच आपणास गतिरोधक व सूचना फलक बसवून देवू असे आश्वासन मिळाले होते.आजपर्यंत हे काम अपूर्ण आहे.ते पूर्ण होणे गरजेचे आहे.शाळेत येणारी मुले लहान असून त्यांचे संरक्षण महत्वाचे ठरते.काही वाहने नियमांचे पालन न करता वेगात धावतात त्यामुळे गतिरोधक शाळा परिसरात बसवणे अत्यंत गरजेचे आहे.स्पीड ब्रेकर व बोर्ड दोन्ही बाजूला लावल्यास वाहनांचा वेग कमी होऊन सुरक्षितता निर्माण होईल असा विचार मनात धरून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दिपक देठे यांनी स्पीड ब्रेकर बसवून मिळण्याबाबतचे निवेदन नव निर्वाचीत सरपंच अशोक मामा पाखरे यांना दिले यावेळी मानूर गावचे अभ्यासू व्यक्तीमत्व उल्हास पाखरे सर,ग्राम पंचायत सदस्य भगवान पाखरे उपस्थित होते.

COMMENTS