Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन  सुरू असून आज अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सा

Solapur : भेसळयुक्त दुधाच्या साठ्यावर अन्न सुरक्षाची कारवाई
चंद्रकांत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार :फडणवीस
शिवसेनेचे उदयसिंह राजपूत यांचा तो भन्नाट व्हिडिओ अखेर व्हायरल | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन  सुरू असून आज अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष असल्यानं राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या वर्षी सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आणि आगामी वर्षासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या विशेष तरतूदींचा लेखाजोगा सरकारसमोर मांडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत मोठी घोषणा केली. 

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना  1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानं 1 लाख 1 हजार रुपये मिळतील, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे. लेक लाडकी योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही प्रामुख्यानं गरिब कुटुंबातील मुलींसाठी आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करेल. ही आर्थिक मदत मुलीचं वय 18 वर्ष होईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. जे वर्ग श्रेणीनुसार वेगवेगळ्या वयोगटात दिले जातील. 

COMMENTS