पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला असून, मुंबई-पुण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडतांना दिसून येत आहे. मात्र मराठवा
पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला असून, मुंबई-पुण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडतांना दिसून येत आहे. मात्र मराठवाड्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकर्यांकडून पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र कृषी विभागाने शेतकर्यांना मोलाचा सल्ला देत, पाऊस चांगला पडला असेल तरच पेरणी करा असा सल्ला दिला आहे.
बिपरजॉय चक्रिवादळामुळे दडी मारून बसलेला मान्सून राज्यभरात सक्रीय झाला आहे. मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने धुंवाधार बॅटिंग केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकर्यांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम लांबला होता. आता राज्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकर्यांमध्ये पेरणीची तयारी करण्यात येत आहे. परंतु आता राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकर्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहे. राज्यातील अनेक भागांत बागायतदार शेतकर्यांनी मका, कापूस, सोयाबीन आणि बाजरीची पेरणी केलेली आहे. परंतु कोरडवाहू शेतकर्यांच्या पेरण्या पावसामुळे खोळंबलेल्या आहे.
100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस होत असला तरी मरावाड्यात अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत 100 मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभागाने म्हटले आहे. कमी पावसात पेरणी केल्यास पिकांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आणखी आठवडाभर चांगल्या पावसाची वाट बघावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
COMMENTS