Homeताज्या बातम्यादेश

कोट्यवधींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दक्षिण चित्रपट निर्मात्याला अटक

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी आणि तिचे पती-निर्माते रवींद्र चंद्रशेखरन हे नेहमीच चर्चेत असतात. रवींद्र चंद्रशेखरन हा साऊथचा प्रसिद्ध च

कोपरगाव नगरपरिषदेच्या फंडातुन एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी : स्वप्नील निखाडे
तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, ०३ मे २०२२ l पहा LokNews24
‘किसी का भाई किसी की जान

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी आणि तिचे पती-निर्माते रवींद्र चंद्रशेखरन हे नेहमीच चर्चेत असतात. रवींद्र चंद्रशेखरन हा साऊथचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. मात्र आता चंद्रशेखरन याच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आली आहे. त्यामुळे चंद्रशेखरनच्या अडचणीही वाढल्या आहेत. रवींद्र चंद्रशेखरनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याच्या व्यवसायाचा प्रस्ताव देऊन त्यानी एका व्यावसायिकाची फसवणुक केली आहे. व्यावसायिकाला तब्बल 15.83 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रविंदरला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यावसायिकाची 15.83 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेच्या इन्स्ट्रुमेंट डॉक्युमेंट फ्रॉड ने गुरुवारी रविंदर चंद्रशेखरनला अटक केली आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की, ‘माडव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे बालाजी कापा यांनी ग्रेटर चेन्नई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की ऑक्टोबर 2020 मध्ये लिब्रा प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक रविंदर चंद्रशेखरन यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी नवीन व्यवसायाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला आणि आर्थिक मदत मागितली. त्यांनी 17 सप्टेंबर 2020 रोजी गुंतवणूक करार केला आणि 15.83 कोटी रुपये दिले. रक्कम मिळाल्यानंतर रविंदरने ऊर्जा व्यवसाय सुरू केला नाही आणि रक्कम परत केली नाही.या तक्रारीच्या आधारे रविंदरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीएफ पुढील तपास करत आहे. या तपासादरम्यान रविंदरने बालाजी कापाकडून गुंतवणूकीचा करार करतांना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS