Homeताज्या बातम्यामनोरंजन

साऊथ अभिनेते जॉनी जोसेफ यांचं निधन

साऊथ सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत नकारात्मक भूमिकांसाठ

शिवसेनेच्या 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदत
पुण्यात ओला, उबेर टॅक्सी सेवा बंद
म्हाडाच्या इमारतीला आग, 135 नागरिकांची सुटका

साऊथ सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते कुंदारा जॉनी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केरळच्या कोल्लम येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुंदारा जॉनी यांना मंगळवारी हृदविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ केरळ येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाळ यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, ‘जॉनी यांनी त्यांच्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले’. कुंदारा जॉनी यांनी १९७९ मध्ये नित्या वसंतम’या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. कुंदारा यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये वेगवगेळ्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी किरीद आणि चेनकोल या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यात. त्यांच्या या भूमिकेचे खूपच कौतुक झाले होते. त्यांनी मल्याळमसोबतच तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले. वाहकाई चक्रम आणि नदीगन या तमिळ चित्रपटात त्यांनी काम केले होते.

COMMENTS