Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कृष्णा’च्या महिला सभासद गिरवणार अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे

शिवनगर : ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना होणार्‍या सभासद शेतकरी महिलांना शुभेच्छा देताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले व मान्यवर. ज्ञान

कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषीमंत्री दादाजी भुसे
बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्यासह 7 कोंबड्या ठार; चार शेळ्या गायब; अंदाजे साडेचार लाखांचे नुकसान
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना; ’व्हीएसआय’चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर
कराड / प्रतिनिधी : शेती व्यवसायात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच अग्रभागी असतात. या महिलांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी यासाठी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 21 सभासद शेतकरी महिला रवाना झाल्या आहेत. त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतकर्‍यांना दरवर्षी ऊसशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील महिला सभासद शेतकर्‍यांना यावर्षी प्रथमच शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पुणे येथे आयोजित शिबीरासाठी रवाना झालेल्या सभासद शेतकरी महिलांना चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, तानाजी देवकाते, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, दिपक पाटील, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, संभाजीराव पाटील, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी शुभेच्छा दिल्या.
शिबीरात सहभागी झालेल्या शेतकरी महिलांचा संपूर्ण खर्च कृष्णा कारखाना करणार आहे. शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
याप्रसंगी बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, शिवाजीराव थोरात, राजकुमार पवार, व्ही. के. मोहिते, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक ऊस विकास अधिकारी शिवाजी बाबर, डॉ. विजय कुंभार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी सभासद उपस्थित होते.

COMMENTS