नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सौम्य ताप होता, त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एका डॉक्टरांनी सांगितले की, सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याआधी मार्चमध्येही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, एका दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले की, त्यांची प्रकृती स्थिर असून त्या ठीक आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सध्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी बंगळुरू येथे झालेल्या विरोधी एकतेच्या बैठकीतही त्या सहभागी झाल्या होत्या.
COMMENTS