Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराचा मुुलगा ठार

कराड / प्रतिनिधी : ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्याने उचलून नेले. काही अंतर गेल्यावर संबंधित मु

शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा मृत्यू; पाटण तालुक्यातील रोमणवाडी येथील दुर्दैवी घटना
स्व. एन. डी. पाटील यांच्या स्वप्नांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील
तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कराड / प्रतिनिधी : ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्याने उचलून नेले. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथेच सोडून बिबट्याने ऊसाच्या शिवारात धूम ठोकली. आकाश पावरा (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून ग्रामस्थांनी त्यांच्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा न लावल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. त्या परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. मात्र, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्यात आला नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. यापूर्वीही येणके गावामध्ये बिबट्या उसाच्या शिवारात आला होता.

COMMENTS