Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवायाने केली सासूची निर्घृण हत्या

वाशिम प्रतिनिधी - वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या एका जवायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली असून.य

Ahmednagar : वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान
वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – मुख्यमंत्री शिंदे
पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत-जास्त झाडे लावावीत : ना. रामराजे नाईक-निंबाळकर

वाशिम प्रतिनिधी – वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या एका जवायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली असून.यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीवरही प्राण घातक हल्ला करीत तिला ही  गंभीर जखमी केले आहे, त्यांच्यावर औरगांबाद येथे उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अब्दुल हाफीज अब्दुल सलाम रा.बिलाल नगर,वाशिम असं या आरोपीचं नाव आहे.या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या आरोपी अब्दुल हाफिज अब्दुल सलाम याचे आपल्या पत्नी सोबत अनेक वर्षा पासून वाद सुरु होते.दरम्यान  वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने आपल्या सासू रुबीना बी हिच्या   डोक्यावर फावडा मारल्याने त्यामध्ये ती  जागीच ठार झाली . तर पत्नी सबा परवीन याच्यावर सुद्धा आरोपी पतीने फावड्याने जोरदार हल्ला चढविला यामध्ये सबा ही गंभीर जखमी झाली असता,  त्याला औरंगाबाद येथे उपचारा करीता हलवण्यात आले असून तिच्यावर  उपचार सुरु आहे.

या प्रकरणी आरोपी अब्दुल हाफीज  यांच्यावर वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास वाशिम शहर  पोलीस करीत आहे.

COMMENTS