solapur : वाळू चोरीला लगाम घालू ; पोलिस महानिरीक्षक (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

solapur : वाळू चोरीला लगाम घालू ; पोलिस महानिरीक्षक (Video)

मंगळवेढ्यातील घडलेले घटना अत्यंत दुर्देवी असून वाळू चोरीला  लगाम घालण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने आता ॲक्शन प्लॅन राबवण्यात येणार असल्याची माहिती क

Solapur: शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला क्लास…
Solapur : मंद्रुपच्या अप्पर तहसिलदार उज्ज्वला सोरटे यांची अखेर बदली
Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)

मंगळवेढ्यातील घडलेले घटना अत्यंत दुर्देवी असून वाळू चोरीला  लगाम घालण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने आता ॲक्शन प्लॅन राबवण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करांचा बिमोड करण्यासाठी महसूल विभाग, पोलिस व आरटीओ संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत . पोलीस शिपाई गणेश सोलंनकर यांना धडक देऊन ठार मारल्याच्या घटनास्थळी पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी भेट देवून पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चालू केलेल्या ऑपरेशन परिवर्तन मोहिमेचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधिक्षक हिमतराव जाधव, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील,पोलिस निरीक्षक सुहास जगताप,सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.बी.पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे,पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS