Solapur : जवानाने केला गोळीबार एक जण जागीच ठार | LokNews24

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : जवानाने केला गोळीबार एक जण जागीच ठार | LokNews24

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील भातांबारे गावातील गोरोबा महात्मे या एस आर पी एफ जवानाने पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या गोळीबारत एक

Madha : उजनी धरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Solapur: शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला क्लास…
Solapur : या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे (Video)

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील भातांबारे गावातील गोरोबा महात्मे या एस आर पी एफ जवानाने पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या गोळीबारत एकजण जागीच ठार झाला आहे. तर एकावर सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पत्नीवर असणाऱ्या चारित्र्याच्या संशयावरून बोलण्यासाठी जवानाचे सासरचे मंडळी काल भातांबारे गावी आले होते. मात्र, बोलणं फिसकटल्यामुळे जवानाने  रागाच्या भरात सरकारी पिस्टलचे चार राउंड फायर केले, यामध्ये  मेहुण्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. नितीन भोसकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर बालाजी महात्मे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे.
      या प्रकरणी गोरोबा महात्मे या एस आर पी एफ जवानाला वैराग पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे.घटनास्थळावरून एक सरकारी पिस्टलसह 26 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. वैराग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी गोरोबा महात्मेवर  गुन्हा दाखल करण्यात आला  आहे

COMMENTS