Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींना दिलासा

सुरत सत्र न्यायालयाकडून जामीन

सुरत/वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये प्रचारादरम्यान सगळे म

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहीक प्रयत्नाची गरज : विवेकभैया कोल्हे.
बचत गटाच्या उत्पादनांनी ‘एकवीरा मार्केट’ गजबजले
तुकाराम सुपेकडे पुन्हा सापडले 58 लाख रूपये

सुरत/वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये प्रचारादरम्यान सगळे मोदी आडनावाचे लोक चोर असतात असे वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची सुनावली होती. तर सोमवारी राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह आणि तमाम काँग्रेस नेते सुरतमध्ये पोहचले होते.
सुरतच्या कोर्टात जी आव्हान याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर 30 दिवसांची मुदत दिली होती. त्या तीस दिवसांच्या आत राहुल गांधी यांनी कोर्टात अपील करणे आवश्यक होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे. त्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. आता याबाबत नेमके काय होईल ते 13 एप्रिलला समजू शकणार आहे. राहुल गांधी यांना फक्त जामीन मंजूर होऊन त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही. मात्र दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय झाला तरच खासदारकी रद्द होण्याची जी कारवाई होती त्यावर विचार होईल. हे संपूर्ण चार वर्षापूर्वीचे असून राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले होते. ज्यामध्ये त्यांना असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने घेतला आहे.

COMMENTS