…तर, पुन्हा युद्धाचा भडका

Homeताज्या बातम्यासंपादकीय

…तर, पुन्हा युद्धाचा भडका

जगावर आपलेच अधिराज्य हवे, आपल्या शेजारी देश आपल्याच धोरणावर चालले पाहिजे, अशी महत्वाकांक्षी वृत्ती पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातून दिसून आली. मात्र

एकीकडे दिलासा दुसरीकडे टांगती तलवार
कॉलेजियम पद्धत आणि संभ्रम
न्यायपालिका – सरकार संघर्ष वाढणार

जगावर आपलेच अधिराज्य हवे, आपल्या शेजारी देश आपल्याच धोरणावर चालले पाहिजे, अशी महत्वाकांक्षी वृत्ती पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धातून दिसून आली. मात्र या दोन्ही युद्धात, मानवी रक्तपात, आर्थिक नुकसान, कधीही भरून न येणारे नुकसान, होत्याचे नव्हते झालेले शहर, हे संगळ पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात संपूर्ण जगानं अनुभवलं. त्यानंतर युद्ध नको, तर शांतता हवी असा सूर सर्वच देशांतून निघू लागला. शांततामय जीवन जगून, विकासाचे नवे मार्ग उघडण्यासाठी विविध देश सज्ज झाले. त्यातून तंत्रजानाचे नवे दालन खुले झाले. आर्थिक प्रगती झपाटयाने झाली. मात्र त्याचबरोबर जगावर अधिपत्य गाजवण्याची ईष्या या श्रीमंत देशात निर्माण होऊ लागली. आपलेच ध्येय धोरण शेजारच्या राष्ट्राने अवलंबावी, अन्यथा, त्यांची रसद, दानापाणी बंद करण्याची धमकी शेजारी शक्तीशाली देश देऊ लागले. त्यातून रशियाचे महत्वाकांक्षी धोरणातून युक्रेनवर झालेला हल्ला करून, या तिसर्‍या युद्धाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. युके्रन या छोटयाश्या देशाला आपल आपल्या कब्जात काही दिवसांत घेऊ, अशी मनीषा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची होती. मात्र युक्रेनने रशियाच्या हल्ल्याला तोंड देत, त्यांचा कडवा प्रतिकार केला. 24 फेबु्रवारी 2022 पासून सुरु झालेले युद्ध अजूनही संपण्याची चिन्हे दिसेनात. तर अनेक ठिकाणी युके्रनच्या सैन्याने रशियाच्या सैन्याला अस्मान दाखवले आहे. त्यामुळेच पुतीन भयंकर चिडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या राखीव सैन्यातील 3 लाख सैन्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाची ही कृती आपल्या अति महत्वाकांक्षीवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 7 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. मात्र युद्ध अजूनही सुरूच असतांना पुतीन यांनी दोन दिवसांत दोन मोठया घोषणा करून, जगाला पुन्हा युद्धाच्या खाईत लोटण्याचे संकेत दिले आहेत. पुतीन यांनी युक्रेनचे चार भूभाग म्हणजेच 20 टक्के प्रांत रशियाला जोडण्याची तयारी सुरू केली आहे. यासोबतच 3 लाख राखीव सैन्याच्या तैनातीचा आदेशही दिला आहे. रशियाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्यास आमच्याकडे असलेल्या सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करू, असा थेट इशारा रशियाने पाश्‍चिमात्य देशांना विशेषतः अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे रशियाचे धोरण तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने टाकलेले पाऊल दिसून येत आहे. पुतीन लवकरच एक व्यापक कॉल-अ‍ॅपची घोषणा करू शकतात. त्यामुळे युद्धाला तोंड फुटू शकते. रशियाच्या सीमा बंद केल्या जाऊ शकतात. त्यामुळेच रशियन नागरिक देश सोडून जाऊ लागले आहेत. पुतीन यांनी राखीव सैनिकांच्या तैनातीचा आदेश दिल्यानं लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशातली परिस्थिती बिघडत चालली आहे. काही ठिकाणी आंदोलने सुरू आहेत, तर अनेक जण देश सोडून जाण्याची तयारी करत आहेत. रशियन एअरलाईन्सनं 18 ते 65 वर्षे वयोगटात मोडणार्‍या व्यक्तींना तिकीट विकण्यास नकार दिला आहे.त्यामुळे युक्रेनमध्ये हाहाकार उडण्याऐवजी रशियातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धात केवळ युक्रेनचे सैनिकच मारले नाही, तर रशियाचे देखील हजारो सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांवरच झाला नसून, या युद्धाने जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. इंधनांचे दर वाढले, खाद्यतेलाचे दर, आयात-निर्यातीवर परिणाम या युद्धातून दिसून आलने होते. यातून संपूर्ण जग सावरत असतांना, रशिया पुन्हा एकदा हे युद्ध तीव्र करण्याचे दिसून येत आहे. त्यातून तिसर्‍या महायुद्धाचा भडकाच उडण्याची शक्यता असून, याची झळ संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. शाघांय परिषदेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासमोरच जगाला युद्ध नको, अशी भूमिका मांडली होती. मात्र पुतीन युक्रेनला धडा शिकवण्याच्या महत्वाकांक्षी धोरणातून रशियाचे देखील मोठे आर्थिक नुकसान करून घेणार असल्याचे एकंदरित दिसून येत आहे.

COMMENTS