Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, विधानसभेच्या 288 जागा लढवणार : मनोज जरांगे

बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे यांनी सरकारने जर सगेसोयर्‍याच्या आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या

एकाचा जीव धोक्यात घातल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही : जरांगे यांचे मत
सरकारने मोटरसायकल दिली, पण पेट्रोल काढून घेतलं – मनोज जरांगे
आरक्षणप्रश्‍नी तोडगा नाही, केवळ दिशाभूल

बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे यांनी सरकारने जर सगेसोयर्‍याच्या आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याची घोषणा बीडमध्ये केली आहे. बीडच्या सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलन जरांगे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी जरांगे बोलत होते.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, राज्य सरकारने तात्काळ सगळ्या सोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः देखील उभा राहीन, असेदेखील ते म्हणाले. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार असून याची तयारी एक महिन्यापासून सुरू केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींना देखील स्वतःचा प्रचार सोडून आता इतर नेत्यांचा देखील प्रचार करावा लागत आहे, असे देखील मनोज जरांगे यांनी सांगितले.

COMMENTS