तेल अवीव/वृत्तसंस्था ः इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष सलग दुसर्या दिवशीही सुरूच होता. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू असल्यामुळे गाझा
तेल अवीव/वृत्तसंस्था ः इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष सलग दुसर्या दिवशीही सुरूच होता. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू असल्यामुळे गाझापट्टीवर सुरू असलेल्या धुमश्चक्रीवर रविवारपर्यंत तब्बल 500 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यात 100 जण ठार झाले होते. तर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात 198 नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला होता. तर, आता इस्रायलनेही युद्धाची घोषणा केल्याने तिथे संघर्ष वाढला आहे. परिणामी मृतांचा आकडाही वाढला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धात आतापर्यंत 500 पेक्षाही अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक इस्रायलींना कैद केले असल्याचा दावाही हमासकडून करण्यात आला आहे.
इस्रायली सैन्याने रविवारी सांगितले की, इस्रायलमध्ये ज्या ठिकाणाहू गोळीबार झाला होता, त्या लेबनॉनमधील भागात प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात येत आहे. तर, इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गाझा पट्टीच्या आजूबाजूच्या आठ भागात अजूनही कारवाई सुरू आहे.‘हमास’च्या लष्करी म्होरक्याने सर्व पॅलेस्टिनींना इस्रायलशी लढण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. आम्ही पुरेसा संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे, असे तो म्हणाला. ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात युद्धाला तोंड फुटल्याची घोषणा केली. नेतान्याहू यांनी दूरचित्रवाहिनीवरील आपल्या संबोधनात देशवासीयांना देश युद्धात उतरल्याचे सांगितले. ‘हमास’ने कधी कल्पनाही केली नसेल एवढी किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले आपण युद्धात असून, ही निव्वळ लष्करी मोहीम नसून, युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही हमासकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच इस्रायलला सर्वोतपरी मदतीची घोषणा केली. जो बायडेन म्हणाले, मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, अमेरिका इस्रायलच्या सरकारला आणि तेथील लोकांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी तयार आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला बचावाचा आणि इस्रायलच्या जनतेची सुरक्षा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बायडेन यांनी दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल बेंजामिन नेतान्याहू यांनीही आभार व्यक्त केले आहे.
पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी ओलांडली क्रूरतेची परिसीमा- पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये क्रूरतेची परिसीमा ओलांडली. शेकडो दहशतवाद्यांनी घरात घुसून कत्तली केल्या. महिलांना विवस्त्र करून पायाखाली तुडवले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. अनेक महिलांचे अपहरण करून सोबत घेऊन गेले. अनेक प्रमुख व्यक्ती व सैनिकांचेही अपहरण केले आहे. इस्रायलच्या तुरुंगात कैद असलेल्या आमच्या साथीदारांची सुटका करू शकतो, एवढ्या जणांचे आम्ही अपहरण केल्याचा दावा हमासने केला आहे. हल्ल्यात इस्रायलचे 200 लोक मारले गेले आणि 1100 हून जास्त जखमी झाले. अनेक व्हिडिओत इस्रायली सैनिकांना दिलेली क्रूर वागणूक दिसून येत आहे.
COMMENTS