Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संथ मतदानाची होणार चौकशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

मुंबई ः राज्यातील मुंबईमध्ये सहा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले असले तरी, मतदान संथगतीने झाल्याचे समोर आले आहे. मतदान संथगतीने होत असल्यामुळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौर्‍यावर
मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण
’मित्रा’साठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी

मुंबई ः राज्यातील मुंबईमध्ये सहा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले असले तरी, मतदान संथगतीने झाल्याचे समोर आले आहे. मतदान संथगतीने होत असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकठिकाणी रात्री 8 वाजता मतदान पूर्ण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत मंगळवारी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील पाचव्या टप्यात मतादानाची टक्केवारी घटली, त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परीणाम यांची सविस्तर चौकशीचे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिलेत. पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? याची तात्काळ चौकशी करण्यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत.

COMMENTS