नगर पोलिसांचा डंका…मिटके व देशमुखांना बक्षिसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर पोलिसांचा डंका…मिटके व देशमुखांना बक्षिसे

अपराधसिद्धीतील यशामुळे पोलिस महासंचालकांकडून गौरव

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर पोलिसांचा डंका राज्यात वाजला आहे. श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सह

आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट
नागपूर-शिर्डी पहिल्या बसचे श्री साई संस्थानने केले स्वागत
नवरात्रोत्सवानिमित्त समता स्कूच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


अहमदनगर/प्रतिनिधी : नगर पोलिसांचा डंका राज्यात वाजला आहे. श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार पोलिस महासंचालकांकडून जाहीर झाला आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि 25 हजार रुपये मिटके यांना तर 5 हजार रुपये व प्रशस्तीपत्र देशमुख यांना प्रदान केले आहे. मिटके यांनी नगर शहर येथे कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाणेअंतर्गत गु.र.नं.456/2018 भादंवि कलम 376 (अ), (ब), 354,323,506,34, पोक्सो अधिनियम कलम 5 (एम), 6, व 17 या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता. या गुन्ह्यातील आरोपीस 20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली गेली. त्यामुळे या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कामगिरी करता त्यांना गौरविण्यात आले आहे. तर देशमुख यांना नवा मोंढा पोलीस स्टेशन परभणी येथील भादवि 302च्या गुन्ह्याच्या तपासमध्ये आरोपीस जन्मठेप शिक्षा लागल्याने उत्कृष्ट अपराध सिद्धीबद्दल पोलीस महासंचालकांचे रोख रक्कम व प्रमाणपत्र असे बक्षीस जाहीर झाले आहे.

मिटकेंनी लावले कौशल्य पणाला
नगर शहरातील तोफखाना भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. पिडीत मुलगी भराड गल्ली तोफखाना अहमदनगर येथे बाकड्याजवळ सायकल खेळत असताना आरोपी अफसर लतीफ सय्यद याने पीडित मुलीवर अत्याचार केला होता. त्यावेळी या प्रकरणातील दुसरी आरोपी मुन्नी ऊर्फ शमिना लतिफ सय्यद घटनास्थळी आली आणि तिने पीडित मुलीला झालेल्या प्रकाराबाबत तू तुझे घरी कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर मी तुझे घरी येऊन तुझे आईला तुझे नाव सांगेल अशी धमकी दिली व तिला तिच्या घरी पाठवून दिले. पीडित मुलीच्या पोटात दुखत असलेने फिर्यादीने पीडित मुलीला विश्‍वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. मिटके यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी अफसर लतिफ सय्यद व आरोपी मुन्नी उर्फ शमीना सय्यद यांना शिक्षा ठोठावली. या गुन्ह्याच्या तपासाबद्दल मिटके यांना पारितोषिक जाहीर झाले आहे.

देशमुखांच्या कामगिरीची दखल
परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक असताना विद्यमान भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी खुनाच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केला होता. त्यातील आरोपी रईसोद्दीन शेख, अकबर शेख व रउफा उर्फ गौरीबी शेख यांना जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. या कामगिरीबद्दल देशमुख यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

COMMENTS