पाथर्डी प्रतिनिधी - येणाऱ्या गळीत हंगामात वृद्धेश्वर कारखान्याने ऊस गाळपासाठी सहा लाख मॅट्रिक टन उद्दिष्ट ठेवले आहे सध्या कारखाना कार्यक्षेत्
पाथर्डी प्रतिनिधी – येणाऱ्या गळीत हंगामात वृद्धेश्वर कारखान्याने ऊस गाळपासाठी सहा लाख मॅट्रिक टन उद्दिष्ट ठेवले आहे सध्या कारखाना कार्यक्षेत्रातील परिस्थिती पाहता ऊस गळपाचे हे उद्दिष्ट थोडे जास्त वाटत असले तरी कार्यक्षेत्रा बाहेरून ऊस आणण्यासाठी जुने संबंध आणि संपर्क ठेवलेला आहे.त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊन गाळपासाठी अपेक्षीत उस उपलब्ध होईल.यावर्षी गाळप हंगामाच्या दृष्टीने कारखान्याने चांगल्या प्रकारे नियोजन करून तयारी केली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांनी व्यक्त केले.तालुक्याची कामधेनु असलेल्या वृद्धेश्र्वर सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीचा गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन प्रारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ संचालक शेषराव ढाकणे त्यांच्या सुविद्य पत्नी भिमाबाई ढाकणे व बाबासाहेब किलबिले त्यांच्या सुविद्य पत्नी मुक्ताबाई किलबिले या दांम्पत्याच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात राहुल राजळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वृद्धेश्वरचे अध्यक्ष माजी आमदार आप्पासाहेब राजळे होते. यावेळी उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, बाळासाहेब गोल्हार, कुशिनाथ बर्डे, नारायण काकडे, सिंधुताई जायभाये, काशिबाई गोल्हार, सिंधुताई साठे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, उपसभापती कुंडलिक आव्हाड, रविंद्र आरोळे, मधुकर देशमुख, शेषराव कचरे, नारायण पालवे,अरुण मिसाळ, शुभम गाडे, संजय फुंदे, विजय आव्हाड, अंकुंश कासुळे, सचिन नेहुल, अनिल बोरुडे, सचिन वायकर, सतिश शिरसाट, सुनिल ओव्हळ, शहादेव दराडे, राजेंद्र दराडे, कार्यकारी संचालक आर.जे. महाजन, जे. आर. पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ शेतकरी, उस तोडणी कंत्राटदार वाहतुकदार, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना राहुल राजळे म्हणाले की, यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी असून याचा ऊस उत्पादनावर परिणाम झालेला आहे.उसाची कमतरता जाणवत असली तरी अशाही परिस्थितीत सर्वच कारखान्यांनी एक नोव्हेंबर पर्यंत कारखाने सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी केली असुन आपल्या वृद्धेश्वर कारखान्याने ऊस गाळपासाठीचे चांगले नियोजन केले आहे. वाढीव गाळप क्षमता नजरेस ठेवुनच कारखाना अंतर्गत गव्हाण, मिल,बॉयलर व इतर मशिनरीमध्ये पुरक फेरबदल केले आहेत. त्यामुळे मुळ कार्यक्षमतेत भर पडली आहे.गाळपाचा वेग प्रतीदिन ३३०० मेट्रिक टनापर्यंत यामुळे जाऊ शकेल.तसेच कारखान्याचे सर्व सभासदांचा पन्नास हजार रुपयांप्रमाणे वार्षीक विमा उतरविला आहे.उपपदार्थ निर्मिती नसतानाही इतरांचे बरोबरीने ऊस दर दिला आहे. यावर्षी वृद्धेश्वर इथेनॉलचे उत्पादन सुरु करणार आहे. इथेनॉल प्रकल्प आणि इतर प्रकल्पासाठी बऱ्यापैकी कर्ज घेतले आहे.त्या कर्जाची वेळेवर परतफेड व्हावी व शेतकऱ्यांचे सर्व देणी वेळेवर देण्यासाठी आपल्याला कारखाना कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणावा लागणार आहे.आतापर्यंत वृध्देश्वरने शेतकऱ्यांच्या विश्वासावर प्रत्येक वर्षीचे उदिष्ट पुर्ण केले आहे. हा वृध्देश्वरचा इतिहास आहे.त्यामुळे याही वर्षी हे उद्दिष्ट सर्वांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास जाणार आहे असा विश्वास राजळे यांनी व्यक्त केला. यावेळी जेष्ठ संचालक सुभाषराव ताठे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून महिती दिली.तसेच याप्रसंगी बैल, उसतोडणी मजुर अपघाती विमा नुकसान भरपाई धनादेशाचे याप्रसंगी वितरण करण्यात आले. तसेच यावेळी दिवंगत नेते डी.एम.कांबळे व सभासद बाळासाहेब राजळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.शेख यांनी तर संचालक काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले.
COMMENTS