Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारा राज्यांमध्ये होणार एसआयआर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील 12 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे

गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी घेतला उजळणी वर्गाचा आढावा
आरोग्‍य तपासणी शिबिराला भरघोस प्रतिसाद
निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील 12 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ज्ञानेश कुमार यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, आता दुसर्‍या टप्प्यात अंदमान-निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.या राज्यांमध्ये सुमारे 51 कोटी मतदार असून, 5 लाख 33 हजारांहून अधिक मतदान केंद्रे आणि बीएलओ (ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स) तैनात केले जातील. ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले की, एसआयआरचे उद्दिष्ट मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांना समाविष्ट करणे आणि अयोग्य नावे वगळणे हे आहे. प्रत्येक घरात बीएलओ तीन वेळा भेट देऊन माहिती गोळा करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

या राज्यांत होणार मतदार याद्यांची फेरतपासणी
या बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये अंदमान आणि निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

शेवटचा एसआयआर 21 वर्षांपूर्वी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, देशात शेवटचा विशेष सघन सुधारणा (एसआयआर) 21 वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, एसआयआरमध्ये सर्व पात्र मतदारांचा समावेश असेल आणि अपात्र मतदारांना मतदार यादीतून काढून टाकले जाईल. ज्ञानेश कुमार पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी एसआयआर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

COMMENTS