औंध : पौषी उत्सवानिमित्त श्री यमाई देवीची रथात प्रतिष्ठापणा करताना यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, सरपंच सो
औंध : पौषी उत्सवानिमित्त श्री यमाई देवीची रथात प्रतिष्ठापणा करताना यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, सरपंच सोनाली मिठारी, दीपक नलवडे यांच्यासह ग्रामस्थ, भाविक व मानकरी.
मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव उत्साहात
औंध / वार्ताहर : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक पौषी रथोत्सव मोजक्याच भाविक, मानकरी, औंध ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पध्दतीने ’आई उदे ग अंबे उदे’ च्या गजरात पार पडला.
औंधच्या श्रीयमाईदेवी रथोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्रीयमाई देवी मंदिरामध्ये श्री यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधीवतपणे षोडषोपचारे पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते आणण्यात आली. यावेळी देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. गणेश इंगळे यांनी पौरोहित्य व मंत्रपठन केले. दुध, दही, पुष्प अर्पण करून देवीची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याठिकाणी गायत्रीदेवी यांचे लहान बंधू यझदी बाबा यांनी देवीची विधीवत पूजा केली.
ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन यझदी बाबांनी देवीची पालखीत प्रतिष्ठापना केली. त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी यांच्या उपस्थितीत यझदी बाबा यांच्या हस्ते रथपूजन करून देवीची दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, सपोनि प्रशांत बधे, शंकरराव खैरमोडे, चेअरमन उध्दव माने, संतोष शिंदे, शीतल देशमुख, वहिदा मुल्ला, शुभांगी हरिदास, वंदना जायकर, शाकिर आतार, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, चंद्रकांत कुंभार, अनिल माने, गणेश हरिदास, वसंत जानकर, वसंत माने, सदाशिव पवार, दत्तात्रय जगदाळे, नवनाथ देशमुख, केशव जाधव, दिनकर शिंगाडे, प्रशांत खैरमोडे, रमेश जगदाळे, मानकरी माळी, पुजारी, भोई, डवरी, गोंधळी, घडशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS