पुणे ः पुण्यात बिबट्या वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज (20) सकाळी शहरातील वारजे माळवाडी परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्याच

पुणे ः पुण्यात बिबट्या वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज (20) सकाळी शहरातील वारजे माळवाडी परिसरात बिबट्या दिसला आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिक पळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती वनभागाला दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या रेस्क्यू मोहिमेनंतर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले.
वारजे माळवाडी भागातील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरला. अचानक बिबट्या आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावरून पळू लागले. दरम्यान, बिबट्या एका पत्राच्या शेडमध्ये जाऊन लपला. ही माहिती पोलिस अधिकारी व वन विभागाला यांना नागरिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वन अधिकार्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सकाळी आठ वाजल्यापासून वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवली. बिबट्याला पकडण्यासाठी एक मोठी जाळी वन विभागाकडून टाकण्यात आली पण बिबट्याने तिथून पळ काढला. यानंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन (डार्ट) बंदुकीतून मारण्यात आले. काही वेळानंतर बिबट्या बेशुद्ध झाल्यावर वनविभागाने त्याला पिंजर्यात बंद करत रेस्क्यू सेंटरला दाखल केले आहे. त्या ठिकाणी त्याच्यावर योग्य ते उपचार करून पुन्हा त्याला नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
COMMENTS