Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बांधकाम कामगारांनो एकीची वज्रमुठ बांधा ः डॉ. करणसिंह घुले

नेवाशात समर्पण मजदूर संघाच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासाफाटा : नेवासा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समर्पण  फाऊंडेशन संचलित समर्पण मजदूर संघाच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्

पाथर्डी व शेवगावांतील पिकांचे पंचनामे करावेत
कोरोनाने हिरावले ५७८ बालकांचे छत्र l पहा LokNews24
जिल्ह्यात केवळ 16 टक्केच पेरण्या…पावसाचीही चिन्हे

नेवासाफाटा : नेवासा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समर्पण  फाऊंडेशन संचलित समर्पण मजदूर संघाच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्यास नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आपल्या न्याय हक्कांसाठी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी समर्पण मजदूर संघ आपल्या पाठीशी सदैव तत्पर असून बांधकाम कामगारांनो त्यासाठी आपल्या एकीची वज्रमुठ बांधा असे आवाहन समर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी यावेळी बोलताना केले.
                         नेवासा नगरपंचायतच्या प्रांगणात बुधवारी सायंकाळी झालेल्या बांधकाम कामगारांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड हे होते तर अँड.बन्सीभाऊ सातपूते, इंजिनियर सुनीलराव वाघ,नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के,इंजिनियर अनिल खंडागळे, इंजिनियर संपतराव बुळे,इंजिनियर आनंद सोलट, इंजिनियर दत्तात्रय वाबळे,समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, ठेकेदार राजेंद्र परदेशी,मनसेचे कामगार दीपक परदेशी, डेव्हिड साळवे,  मच्छिंद्र गव्हाणे, अनिल सोनवणे,बबनराव राजे,ज्ञानदीप देशमुख,शामभाऊ ढोकणे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी झालेल्या मेळाव्याच्या प्रारंभी भगवान विश्‍वकर्मा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थित मान्यवरांचे समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी स्वागत केले.समर्पण फाऊंडेशनचे प्रवक्ते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी समर्पण फाऊंडेशनचे सामाजिक योगदान व बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम आपल्या मनोगताद्वारे विषद केले.कामगार नेते कृष्णा डहाळे यांनी मेळाव्यात बांधकाम कामगारांच्या हिताच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले ठराव वाचून दाखवले व  पाठपुरावा करण्यासाठी सदरचा ठराव डॉ.घुले यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी इंजिनियर अनिल खंडागळे, ज्ञानदीप देशमुख, दीपक परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी नोंदीत कामगारांना भांड्यांचे संच तर नैसर्गिक मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना दोन लाखाचा धनादेश, मुलींच्या विवाहासाठी 51 हजाराची मदत धनादेशाच्या रूपाने प्रदान करण्यात आली.समर्पण फाऊंडेशनचे प्रवक्ते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बांधकाम कामगार पोपट शेकडे यांनी उपस्थित कामगारांचे व मान्यवरांचे आभार मानले.

COMMENTS