श्रीरामपूरची ‘वाचन संस्कृती’जीवनमूल्ये जोपासणारी : डॉ.अनंता सूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूरची ‘वाचन संस्कृती’जीवनमूल्ये जोपासणारी : डॉ.अनंता सूर

श्रीरामपूर : श्रीरामपूरची वाचन संस्कृती ही मानवी जीवनमूल्ये जोपासणारी असून त्यासाठी डॉ. बाबुराव उपाध्ये आणि साहित्य मित्र परिवाराने 2006पासून सेवाभाव

करंजी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची सोय
पोलिस ठाणे व कर्मचार्‍यांच्या निवास स्थानासाठी निधी द्या
उजनी उपसा जलसिंचन योजना यावर्षीही सुरु राहणार ः बाबुराव थोरात

श्रीरामपूर : श्रीरामपूरची वाचन संस्कृती ही मानवी जीवनमूल्ये जोपासणारी असून त्यासाठी डॉ. बाबुराव उपाध्ये आणि साहित्य मित्र परिवाराने 2006पासून सेवाभावाने सुरु केलेले वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्य आणि साहित्य निर्मिती ही नवोदित साहित्यिकांना दिशादर्शक असल्याचे मत यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटबन येथील श्री गजानन महाराज महाविद्यालयाचे प्रोफेसर आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. अनंता सूर यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ.अनंता सूर यांना राज्यस्तरीय समाजप्रेरक ग्रन्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी डॉ. सूर बोलत होते.संमोहनतज्ञ आणि ‘पोरका बाबू ‘कार डॉ. रामकृष्ण जगताप,गझलकार डॉ. शिवाजी काळे, कवयित्री संगीता फासाटे यांनी पुरस्कार परीक्षक म्हणून डॉ अनंता सूर यांच्या’काटेरी पायवाट’या आत्मचरित्राची निवड केली.या पुरस्कारातील चरित्रग्रन्थ पुरस्कार संगमनेर येथील सेवानिवृत्त प्रा.दिलीप सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.डॉ. अनंता सूर ह्यांनी कविता, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा आदी साहित्य प्रकारात लेखन केले आहे.डॉ. सूर यांच्या साहित्य कार्याचा आणि सामाजिक कार्याचा परिचय डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला.यावेळी प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ.मंदाकिनी उपाध्ये, सौ.गायत्री सूर, कु.स्वरांगी सूर, स्वरांग सूर,निर्मिक उपाध्ये आदी उपस्थित होते.महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे,साहित्य परिवाराचे संस्थापक, अध्यक्ष कविवर्य प्रा.पोपटराव पटारे आदिंनी डॉ.सूर यांचे अभिनंदन करून श्रीरामपूर येथील साहित्यकांना वैदर्भीय साहित्य निर्मितीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून चर्चा केली. सौ. आरती उपाध्ये ह्यांनी नियोजन केले तर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS