Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत श्री रामनवमी उत्‍सवाला आजपासुन सुरूवात ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

अहमदनगर प्रतिनिधी - श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍त श्रींची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा

जेऊर पाटोद्यात बिबट्याने केली शेळीची शिकार
भैरवनाथ विद्यालयात राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात
आ. रोहित पवारांनी केलेला विकास देखवत नसल्याने काहींना पोटशूळ : मनिषा सोनमाळी

अहमदनगर प्रतिनिधी – श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍त श्रींची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी प्रतिमा घेवून सहभागी झाले होते. या प्रसंगी मुख्‍यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, सौ.मिनाक्षी सालीमठ, सौ.कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ उपस्थित होते. श्री रामनवमी उत्सवानिमित्त व्‍दारकामाई मंदिरात अखंड पारायणास सुरवात करण्‍यात आली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन करताना तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मिनाक्षी सालीमठ. श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.मिनाक्षी सालीमठ यांच्‍या हस्‍ते पाद्यपुजा करण्‍यात आली. यावेळी प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व सौ.कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

COMMENTS