Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्साहात

विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे काढली शोभायात्रा

संगमनेर/प्रतिनिधी ः श्रीराम नवमी निमित्ताने विश्‍व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभ

प्रीतिसुधाजी स्कूलचा संस्कार फेस्टीवल ठरतोय आदर्श
राहुरी तालुक्यातील वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून खून
नव्या केंद्रीय सहकार मंत्रालयाचे नगरमधून स्वागत

संगमनेर/प्रतिनिधी ः श्रीराम नवमी निमित्ताने विश्‍व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जय श्रीरामांच्या जय घोषाने संगमनेर नगरी दुमदुमली होती. अभिनव नगर येथील श्रीराम मंदिर येथून सायं.5:30 वा. हनुमान चालीसा व आरती होवून शोभायात्रेची जल्लोषात सुरुवात झाली. यावेळी गीता परिवाराने हनुमान चालीसा वाटप करण्यात आली.
शोभायात्रेत सुरुवातीला सनई चौघडे, घोडे, उंट, लहान मुले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, शबरी वेशभूषेत श्रीराम पंचायत आकर्षक बग्गीत बसले होते. पारंपरिक वाद्य शिवजन्म भुमि जुन्नर महाराणा ढोल ताशा पथक, साईदर्शन डि.जे., गजराज डि. जे. पुढे तरुणांनी श्रीरामांच्या गाण्यांवर ठेका धरला होता. शोभायात्रेत भव्य- दिव्य धार्मिक देखावे, भव्य श्रीरामचंद्र मूर्ती,  भव्य महाबली हनुमान लहान मुलांसाठी आकर्षण ठरले होते, महाबली हनुमान पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आदीवासी नृत्य, मर्दानी खेळ व मल्लखांब प्रात्याषिके चौका-चौकात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. शोभायात्रेत सर्व हिंदू भगिनींनी संख्या लक्षणीय होती. इस्कॉन नगर संकीर्तन- भजन हरे राम, हरे कृष्ण…मिरवणुकीचे आकर्षण होते. सुदाम प्रभुजी, नंदगोप प्रभुजी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, विशाल वाकचौरे, शुभम कपिले यांनी शोभायात्रेकरिता विशेष परिश्रम घेतले होते.

COMMENTS