Homeताज्या बातम्याक्रीडा

दोन वर्षांनंतर श्रेयस अय्यरचे टी-20 संघात पुनरागमन

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे तिलक वर्मा आण

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभावाला फलंदाज जबाबदार ः गिल
क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून तरुण जागीच ठार.
केजमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग’ (एपीएल)चा दिमाखदार उद्घाटन सोहळा

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर या मालिकेला मुकणार असून त्यांच्या जागी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्‍नोई यांची निवड करण्यात आली आहे. भारत-न्यूझीलंड टी-20 मालिका 21 जानेवारीपासून सुरू होत आहे.
श्रेयस अय्यरचे तब्बल दोन वर्षांनंतर टी-20 संघात पुनरागमन होत आहे. त्याने डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली नव्हती. या कालावधीत तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांना प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, श्रेयसने स्थानिक क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वतःची दावेदारी पुन्हा मजबूत केली. 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता, तर 2025 मध्ये त्याने पंजाब किंग्जला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे, अशी माहिती बीसीसीआयने अधिकृतपणे दिली आहे. 11 जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या खालच्या बरगड्यांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत दुखापत स्पष्ट झाली असून त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उपचारानंतर तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजेरी लावणार आहे.

COMMENTS