Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 धक्कादायक ! बापानेच केला मुलीचा विनयभंग

मुंबईच्या चेंबूर परिसरात घडली घटना

मुंबई प्रतिनिधी - मुंबईच्या चेंबूर परिसरात वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्त

जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी
रुग्‍णांमधील लक्षणे समजून योग्‍य उपचार करा
दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला

मुंबई प्रतिनिधी – मुंबईच्या चेंबूर परिसरात वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीवर विविध कायद्यांतर्गग गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना, तिला चुकीचा स्पर्श केला. या घटनेनंतर पीडित मुलगी ही मानसिक तणावात होती.
यातूनच मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घेऊन झोपली. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिल जवळील चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगी शुद्धीवर आल्यावर डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यावेळी आरोपी बापाने तेथून पळ काढताना, डाॅक्टरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, डाॅकटरांना धक्का मारून आरोपीने पळ काढला. अखेर पोलिसात गुन्हा नोंदल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS