Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरमध्ये धक्कादायक घटना; रिक्षाचालकाने महिलेला फरफटत नेलं

कोल्हापुर - रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यातले वाद काही नवे नाही. रिक्षा चालवणे, रिक्षा पार्क करणे, रिक्षाचे भाडे अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून व

श्री.शारदा वाचनालय ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्काराने सन्मानित
आंदोलन करताच बसस्थानका समोरील परिसर झाला दुर्गंधीमुक्त
गणेश मुद्दमेने साकारली पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती

कोल्हापुर – रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यातले वाद काही नवे नाही. रिक्षा चालवणे, रिक्षा पार्क करणे, रिक्षाचे भाडे अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून वाद होतात. पण यातले काही वाद भयानक स्वरुप धारण करतात, त्यातून गंभीर गुन्हे घडतात. ताजी घटना तशाच प्रकारची दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक रिक्षा चालक वेगाने रिक्षा पळवत असल्याचे दिसत आहे. रिक्षाच्या मागील बाजूस पत्र्याला एका महिलेच्या कपड्याचे टोक अडकले आहे. वेगाने जात असलेल्या रिक्षासोबत महिलेची फरफट सुरू आहे. रस्तावरून जात-येत असलेल्यांना महिलेची फरफट सुरू असल्याचे लक्षात येते. यानंतर काही नागरिक धावत पुढे जातात आणि आरडाओरडा करून चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगतात. पण रिक्षा चालक सुसाट वेगाने पुढे निघून जातो. या पद्धतीने रिक्षा चालकाने महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. पण ‘रिक्षा थांबव’ असे सांगणाऱ्यांची वेगाने वाढत असलेली संख्या बघून अखेर चालकाने रिक्षा थांबवली. तो पर्यंत फरफट झाल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली होती. रिक्षा थांबली आहे आणि महिला जखमी झाली आहे हे बघून संतापलेल्या नागरिकांनी रिक्षावाल्याला पकडले आणि बेदम चोप दिला. कोणीतरी राग व्यक्त करण्यासाठी रिक्षाची काच फोडली. मिळालेल्या माहितीनुसार, मीना धनपाल साठे (62, रा. पंत मंदिराजवळ, राजारामपुरी, 14 वी गल्ली) या खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. तिथून सायबर चौक ते माऊली चौक असा प्रवास त्यांनी रिक्षातून केला. चालक सज्जाद अमिद मोमीन आणि मीना साठे यांच्यात रिक्षाभाडे या मुद्यावरून वाद झाला. वाद झाला त्यावेळी रिक्षाचा आधार घेऊन मीना साठे उभ्या होत्या. वारा आल्यामुळे नकळत त्यांच्या साडीचा पदर रिक्षाच्या मागील पिवळ्या सेफ्टी गार्डमध्ये अडकला. रिक्षा चालकाने वाद संपवण्याऐवजी अचानक रिक्षात बसून रिक्षा वेगाने सुरू केली. यामुळे मीना साठे यांची फरफट सुरू झाली. काही नागरिकांनी धावत पुढे जाऊन रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. पण सलग थोडा वेळ रिक्षा पळवल्यानंतर वाढती गर्दी बघून सज्जाद अमिद मोमीनने रिक्षा थांबवली. तोपर्यंत रिक्षा जवळपास 100 मीटरचे अंतर पार करून पुढे गेली होती. फरफट झाल्यामुळे मीना साठे जखमी झाल्या होत्या, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार बघून नागरिकांनी रिक्षाचालक सज्जाद अमिद मोमीन याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मीना यांचा मुलगा किरण धनपाल साठे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीआधारे कारवाई करून हलगर्जीपणाने रिक्षा चालविल्याप्रकरणी रिक्षा चालक सज्जाद अमिद मोमीन याला अटक केली.

COMMENTS