Homeताज्या बातम्यादेश

‘टीम इंडिया’ला धक्का; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह

नवी दिल्ली प्रतिनिधी - वन-डे विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या भारतीय संघाला पहिल्या सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर फ

मेस्सीला रोनाल्डो पेक्षाही दुप्पट रकमेची ऑफर
टीम इंडियाची चाहत्यांना दिवाळी भेट, नेदरलँडचा १६० धावांनी धुव्वा
नीरज चोप्राची पुन्हा सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली प्रतिनिधी – वन-डे विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या भारतीय संघाला पहिल्या सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे रविवारी चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात त्याचा सहभाग अनिश्चीत मानला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार डेंग्यूची लागण झाल्यामुळे शुबमन गिलने एम.ए.चिदंबरम मैदानात सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम शुबमन गिलच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असून शुक्रवारी त्याची आणखी एक चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीच्या निकालावर तो पहिल्या सामन्यात खेळेल की नाही याचा निर्णय घेतला जाईल.शुबमन गिलला यातून सावरण्यास वेळ लागला तर सध्या भारताकडे रोहित शर्मासोबत सलामीला येण्यासाठी इशान किशन आणि लोकेश राहुल हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. परंतु शुबमन गिल सध्या ज्या फॉर्मात आहे ते पाहता त्याची अनुपस्थितीत संघाला नक्कीच जाणवेल असं बोललं जातंय. यंदाच्या वर्षात वेस्ट इंडिज दौऱ्याचा अपवाद सोडला तर गिलच्या कामगिरीत कमालीच सातत्य पहायला मिळालं आहे. वर्षाच्या सुरुवातीस न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात गिलने द्विशतक झळकावलं होतं. याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये गिलने धावांचा पाऊस पाडला होता. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताला अक्षर पटेलच्या दुखापतीचा फटका बसला आहे. त्यामुळे गिल या आजारपणातून कधी सावरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

COMMENTS