शरद पवारांना धक्का; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांना धक्का; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने अनेक विकासकामांना स्थगिती देत आघाडी सरकारला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

डोंगराळ भागातील मुलांच्या शिक्षणाची हेळसांड
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
नितीन गडकरी Live : राज्यासाठी कोट्यवधींचा निधी… रस्त्यांची कामे होणार दर्जेदार (Video)

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने अनेक विकासकामांना स्थगिती देत आघाडी सरकारला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का दिला होता. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका होत असून, यात भाजपचे रामदास तडस यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका पार पडत असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून रामदास तडस यांची बिनविरोध निवड झाली आहे. आम्ही 15 वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच 2019 मध्ये 23 वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते असे तोमर म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडत आहेत. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संस्थे अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, ईथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश या स्पर्धेचा असतो.

COMMENTS