Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का

दहा नगरसेवक करणार ठाकरे गटात प्रवेश

छ.संभाजीनगर ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 123 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही. त्यातच छत्रपती संभाज

राज्यात दोन उपसरपंच पद्धत लागू करा
कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी दिशा दर्शक ठरेलः मुख्यमंत्री शिंदे
सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागा : मनोज जरांगे

छ.संभाजीनगर ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 123 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही. त्यातच छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे 10 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार असल्यामुळे संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान दोन आमदारांना शहरात फटका बसू शकतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 10 पेक्षा अधिक नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 7 जुलै रोजी संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरमध्ये होणार्‍या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा प्रवेश सोहळा होणार आहे. आम्ही फक्त शिंदे गट आणि भाजपसाठीच काम करायचे का? असा प्रश्‍न ठाकरे गटात प्रवेश करणार्‍या भाजप नेत्यांनी विचारला आहे. त्यामुळे या प्रवेशानंतर संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका मंत्री अतुल सावे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटात प्रवेश करणार्‍या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. एका नगरसेवकांना मागील विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.  भाजपच्या 6 पेक्षा अधिक नगरसेवकांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका पार पडत आहे. अशात हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का समजला जातोय. विशेष म्हणजे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्‍चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा पश्‍चिम विधानसभेतून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर राजू शिंदेंचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपने मोठी मेहनत केली. त्यामुळे संदिपान भुमरे यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पदाधिकार्‍यांना विचारले जात नाही. एवढेच काय तर विजयानंतर आभार देखील मानण्यात आले नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

COMMENTS